कोल्हापूर : अथर्व इंटरट्रेड प्रा. लि. या कंपनीने दौलत कारखाना सरफेसी कायद्यांतर्गत कोल्हापूर जिल्हा बँकेबरोबर झालेल्या करारानुसार भाडेतत्त्वावर चालवण्यास घेतला आहे. त्यानुसार मागील ६ गळीत हंगाम यशस्वी करून कार्यक्षेत्रातील सर्व ऊस पुरवठादार, तोडणी वाहतूकदार यांची बिले वेळेत अदा केली आहेत..
बँकेबरोबर झालेल्या करारानुसार गळीत हंगाम २०१०-११ ची थकीत एफआरपी रक्कम देण्याची प्रक्रिया सुरु आहे. ज्या ऊस पुरवठादार शेतकऱ्याच्या बँक खात्याचे पडताळणी व शहानिशा करून झालेली आहे. त्यांच्या बँक खात्यावर थकीत एफआरपी रक्कम अथर्व प्रशासनाने जमा केली आहे. ज्या ऊस पुरवठादारांनी बँक खात्यांची पडताळणीझालेली नाही. अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्याच्या कागदपत्राची पडताळणी गावनिहाय शेतीगट कार्यालयाकडून करण्यात येत असून गावाला दिलेल्या तारखेला कारखाना कार्यस्थळावर येण्याचे आवाहन अथर्व व्यवस्थापनाने केले आहे.