कोल्हापूर : श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना १० टक्के वेतनवाढ

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य साखर संघ व महाराष्ट्र शासन यांच्या निर्णयाप्रमाणे येथील श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने नोव्हेंबर २०२५ च्या पगारापासून दहा टक्के वेतन वाढ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.महाराष्ट्रातील साखर व उपपदार्थ उद्योगातील सहकारी, खाजगी, भाडेतत्त्वावर, सहभागीदारी तत्त्वावर असणाऱ्या सर्व कारखान्यांना १० टक्के वेतनवाढ करण्याबाबत अंमलबजावणी करण्याबाबत त्रिपक्ष समितीच्या वतीने शिफारशी केल्या होत्या.

राज्य पातळीवरील केलेल्या करारातील कलम ३३ मधील तरतुदीनुसार मान्यताप्राप्त शर्करा औद्योगिक श्रमिक संघ (इंटक) शिरोळ व श्री दत्त साखर कारखाना यांच्यात वेतन वाढीचा करार करण्यात आला. या वेतन वाढीमुळे कामगारांच्या उत्साहाचे व आनंदाचे वातावरण आहे. करारप्रसंगी कामगार संघटनेतर्फे दत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यान पंडित गणपतराव पाटील, अध्यक्ष रघुनाथ पाटील, उपाध्यक्ष शरदचंद्र पाठक, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांचा सत्कार झाला. प्रदीप बनगे यांनी आभार मानले. कामगार युनियनचे अध्यक्ष प्रदीप बनगे, उपाध्यक्ष संपत पाटील, जनरल सेक्रेटरी अरुण पाटील, एचआर मॅनेजर जयदीप देसाई, हेट टाइम कीपर राजेंद्र केरीपाळी, तसेच विजय वाणी, तानाजी गावडे, धोंडिराम पाटील, चंद्रशेखर कलगी, आनंद आंबुसकर, दत्ता गावडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here