कोल्हापूर : तांबाळे (ता. भुदरगड) येथील इंदिरा गांधी भारतीय महिला सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी विजयमाला बाजीराव देसाई यांची, तर उपाध्यक्षपदी रंजना कृष्णाजी पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी प्रादेशिक उपसंचालक (साखर) गोपाळ मावळ होते. कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली. अध्यक्षपदासाठी देसाई व उपाध्यक्षपदी पाटील यांचे नाव संचालिका संयोगिता हलगेकर, माधुरी इंगळे यांनी सुचविले.
संचालिका जयमाला सूर्यवंशी व शालिनी कल्याणकर यांनी अनुमोदन दिले. अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्याने अध्यासी अधिकारी मावळ यांनी निवड बिनविरोध जाहीर केली. सुलक्षणा चौगले, अनुराधा देसाई, दीपा देसाई, राजकुंवर देसाई, स्वाती जाधव, सुनीता पाटील, मनाली पाटील, शेवंताबाई सावंत, आक्काताई शेटके, अना डिसोजा, आशाताई पाटील, नंदाताई पाटील, शासकीय लेखापरीक्षक विजय पाटील आदी उपस्थित होते. कार्यकारी संचालक बी. एन. पवार यांनी प्रास्ताविक केले. विश्वनाथ केसकर यांनी आभार मानले.