लातूर: विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा २०२५-२६ चा चालू गळीत हंगाम जोमात सुरू आहे. मांजरा परिवाराचे मार्गदर्शक, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हंगाम गतीने सुरू आहे. कारखान्याकडून चालू गाळप हंगामामध्ये किमान ३,१५० रुपये प्रति मेट्रिक टन ऊस दर जाहीर करण्यात आला आहे. कारखान्याने सात डिसेंबरपर्यंत १,३३,२९० मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून ८२ हजार २५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.
कारखान्याने ३० नोव्हेंबर अखेर कारखान्याकडे आलेल्या उसापोटी प्रति मेट्रिक टन २,७५० रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. कारखान्याकडे ३० नोव्हेंबर २०२५ अखेर गाळपास आलेल्या उसाच्या बिलासाठी प्रति मेट्रिक टन दोन हजार ७५० रुपये प्रमाणे पहिल्या हप्त्याची रक्कम खात्यावर जमा करण्यात आली. कारखान्याने १२ लाख २१ हजार ६१८ लिटर इथेनॉलचे उत्पादन घेतले आहे. आणि ४९,५२,८५० केडब्ल्यूएच विजेची निर्यात महावितरण कंपनीला केली आहे. चालू हंगामात गाळपासाठी शंभर टक्के उसाची तोडणी हार्वेस्टरद्वारे सुरू आहे.


















