लातूर : देवणी तालुक्यातील तळेगाव भोगेश्वर येथील जागृती शुगर ॲण्ड अलाइड इंडस्ट्रीजच्या ७ लाख २१ हजार १ व्या साखर पोत्यांचे पूजन कारखान्याचे संस्थापक माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. राज्यातील खासगी साखर कारखानदारीत नावलौकिक असलेल्या तळेगाव येथील जागृती शुगर ॲण्ड अलाइड इंडस्ट्रीजच्या २०२५-२६ च्या चालू गळीत हंगामात ३ लाख ६३ हजार ४६० मे. टन उसाचे गाळप करून ११.५७ उताऱ्यासह १ कोटी ६ लाख ८४ हजार ८०० युनिट वीज निर्यात केली आहे.
कारखान्यातर्फे उत्पादित केलेल्या ७ लाख २१ हजार १ साखर पोत्यांचे पूजन माजी मंत्री तथा साखर कारखान्याचे संस्थापक दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. यावेळी जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, राम भंडारे, धनाजी कोटे, जनरल मॅनेजर गणेश येवले, मुख्य शेतकी अधिकारी रामानंद कदम, मुख्य अभियंता अतुल दरेकर, आसवनी प्रमुख विलास पाटील, फायनान्स अधिकारी ए.व्ही. सूर्यवंशी, उपमुख्य अभियंता अक्षय सूर्यवंशी, ऊस पुरवठा अधिकारी लक्ष्मण बिरादार, चीफ अकाउंटंट सर्जेराव पाटील यांच्यासह जागृती शुगरमधील विविध खातेप्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

















