लातूर : जागृती शुगरच्या ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना बसविले रिफ्लेक्टर बोर्ड

लातूर : रस्ते सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यातील साखर कारखानदारीत नावलौकिक असलेल्या तळेगाव (भो.) येथील जागृती शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज लि.,च्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर-ट्रेलरला लातुरातील प्रादेशिक परिवहन कार्यालय व जिल्हा रस्ता सुरक्षा समितीमार्फत रिफ्लेक्टर बोर्ड बसविण्यात आले. यावेळी वाहनचालकांना रस्त्यावरील होणारे अपघात टाळण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी वाहनचालकांना रस्त्यावरील अपघात, रस्ते होणारे सुरक्षिततेबाबत कारखाना व्यवस्थापनास व प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक सुनील खंडागळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर गणेश येवले, मुख्य शेतकी अधिकारी रामानंद कदम, मुख्य अभियंता अतुल वरदरेकर, ऊस पुरवठा अधिकारी लक्ष्मण बिरादार, रामदास सोळुंके, सुरक्षा अधिकारी रत्नकांत कुरवडे, कार्यालय अधीक्षक (शेती) राजकुमार कांबळे, विशाल सांडूर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here