लातूर : रेणा सहकारी साखर कारखान्याकडून ४९,२४,५०१ लिटर इथेनॉल उत्पादन

लातूर: येथील रेणा सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामास १९ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रारंभ केला. कारखान्याने १२ फेब्रुवारीअखेर ४,०७,७७५ मे. टन ऊस गाळप करून बी हेवी मोलॅसेस व सिरप इथेनॉलसह सरासरी ११.३९ टक्के साखर उताऱ्यासह ४,२१,१११ क्विंटल साखर उत्पादित केली आहे. या साखर पोत्यांचे पूजन कारखान्याचे संस्थापक सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना त्रिपक्षीय करारानुसार ठरलेली १० टक्के पगारवाढ केली जात असल्याची घोषणा माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केली.

कारखान्याचे चेअरमन अनंतराव ठाकूर यांनी सांगितले की, कारखान्याचा आसवनी प्रकल्पही सुरू आहे. त्यात ४९२४५०१ लिटर इथेनॉल उत्पादन केले आहे. सहवीज निर्मिती प्रकल्पातून ८४४८००० युनिटचे महावितरणला निर्यात झाली आहे. पोती पूजन कार्यक्रमाला व्हा. चेअरमन अँड. प्रवीण पाटील, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हा. चेअरमन प्रमोद जाधव, कारखान्याचे माजी चेअरमन तथा संचालक यशवंतराव पाटील, संचालक आबासाहेब पाटील, धनराज देशमुख, संग्राम माटेकर, तुकाराम कोल्हे, तानाजी कांबळे, शंकरराव पाटील, गोविंद पाटील, रणजित पाटील, बालाजी हाके, वैशालीताई माने, अमृताताई स्नेहलराव देशमुख, तज्ज्ञ संचालक चंद्रचूड चव्हाण, नरसिंग इंगळे, कार्यलक्षी संचालक आण्णासाहेब पाटील, कार्यकारी संचालक बी.व्ही. मोरे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here