लातूर : ‘ट्वेन्टीवन शुगर्स’कडून ऊस शेती यांत्रिकीकरण योजना, शेतकऱ्यांना होणार फायदा

लातूर : मळवटी (ता. लातूर) येथील द्वेन्टीवन शुगर्स कारखान्याकडून शेतकरी आणि बेरोजगार युवकांसाठी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहभागातून ट्रॅक्टर व ट्रेलर खरेदी योजनेद्वारे ऊस शेती यांत्रिकीकरण योजना राबवण्यात येणार आहे. शेतीसोबतच एक चांगला व्यवसाय म्हणून ट्रॅक्टर व ट्रेलर चालवणे फायदेशीर ठरत आहे. इच्छुकांनी कारखाना कार्यालयाशी संपर्क साधून नाव नोंदणी करावी, असे आवाहन कारखान्याच्या वतीने करण्यात आले आहे.

द्वेन्टीवन शुगर्स ने पहिल्या हंगामातच मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक ऊस गाळप करण्याचा मान पटकावला आहे. शेतकरी व सुशिक्षीत बेरोजगार यांना देखील ट्रॅक्टर व ट्रेलर घेता यावे, तसेच यांत्रिकीकरण योजनेला अधिक चालना देण्यासाठी कारखान्याकडून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात येत आहे. या योजनेसाठी सर्व मदत आणि मार्गदर्शन शेतकऱ्यांना कारखान्याकडून करण्यात येणार आहे. इच्छुकांनी कारखाना कार्यालयाशी संपर्क साधून नाव नोंदणी करावी, असे आवाहन कारखान्याचे उपाध्यक्ष विजय देशमुख व जनरल मॅनेजर संतोष बिराजदार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here