लखनौ : प्रख्यात ऊस संशोधक रासप्पा विश्वनाथन (Rasappa Viswanathan) यांनी शुक्रवारी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ शुगरकेन रिसर्च (आयआयएसआर) लखनौच्या संचालक पदाचा कार्यभार स्वीकारला. प्रोफेसर ए. डी. पाठक यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांच्याजागी रासप्पा विश्वनाथ रुजू झाले आहेत. यापू्र्वी विश्वनाथन कोईंम्बतूरच्या ऊस संशोधन संस्थेमध्ये पिक संरक्षण विभागाच्या प्रमुखपदी कार्यरत होते आणि त्यांच्याकडे संशोधक, शिक्षणतज्ज्ञ आणि कृषीतज्ज्ञ म्हणून ३१ वर्षांपेक्षा अधिक अनुभव आहे.
ऊस क्षेत्रातील त्यांच्या संशोधनात उसाच्या १४ लाल सड विरोधीत प्रजातींची ओळख पटवणे, ऊस रोग व्यवस्थापन पद्धती विकसित करणे आणि वाणांचे पुनरुज्जीवन आदींचा समावेश आहे. विश्वनाथन यांचे हाय इम्पॅक्ट फॅक्टर जर्नल्समध्ये २७५ हून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.















