महाराष्ट्र : उद्योजक सोहन शिरगावकर यांची डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्टच्या अध्यक्षपदी निवड

कोल्हापूर : कोल्हापूरचे उद्योजक सोहन शिरगावकर यांची साखर उद्योगातील अग्रगण्य संस्था द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन (इंडिया) च्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. सन २०२५ ते २०२८ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी ही निवड करण्यात आली आहे. शिरगावकर हे एस. बी. रिशेलर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक आहेत. या कंपनीमध्ये साखर कारखान्यासाठी लागणाऱ्या रोलरचे उत्पादन घेतले जाते. तसेच गोकुळ शिरगाव येथील कंपनीत ऊसतोडणी यंत्राची निर्मिती केली जाते. कागल येथील कंपनीमध्ये साखर कारखान्यासाठी लागणाऱ्या इतर साहित्याची निर्मिती केली जाते.

शिरगावकर हे शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ( स्मॅक), कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन, इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स, कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज या औद्योगिक संस्थांमध्ये ते महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. अवनी, एकटी, स्वयं मतिमंद, स्मॅक आयटीआय, भुदरगड आयटीआय, आयआयएफ अशा विविध सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. तसेच ते कर्नाटकमधील उगार शुगर लिमिटेडचे ते कार्यकारी संचालक आहेत. पवनचक्कीसाठी लागणाऱ्या साहित्याची निर्मिती करणाऱ्या सिनर्जी ग्रीन इंडस्ट्रीज लिमिटेडचे ते सहव्यवस्थापकीय संचालक आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here