औरंगाबाद/मुंबई : महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी अधिकाऱ्यांना ऊस तोडणी मजुरांच्या कल्याण आणि विकासाशी संबंधित कामात गती आणण्याचे निर्देश बुधवारी दिले. त्यांच्या अध्यक्षतेखाली या प्रश्नी बैठक घेण्यात आली. दिवंगत गोपिनाथराव मुंडे ऊस तोडणी कामगार कल्याण महामंडळाच्या प्रशासकीय कार्याला गती आणण्यासह संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजनेच्या पहिल्या टप्प्यातील कामांना प्राधान्य देण्याची सूचना मंत्री मुंडे यांनी यावेळी केली.
मंत्री धनंजय मुंडे यांनी ऊस तोडणी कामगारांच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. साखर कारखान्यांना याची माहिती दिली जावी असे ते म्हणाले. त्यांनी दिलेल्या इतर आदेशांमध्ये पुणे आणि परळी येथे महामंडळाची विभागीय कार्यालये स्थापन करण्याचा मुद्दा आहे. येथे कर्मचाऱ्यांसह उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना मंडळाच्या सीईओच्या रुपात नियुक्ती देणे अपेक्षित आहे. या बैठकीत त्यांनी संबंधित जिल्ह्यांना संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेअंतर्गत २० वसतिगृहे सुरू करण्यासाठी जाहीरात प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना दिल्या.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link














