मुंबई : सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठातील विविध विकासकामांसाठी राज्य सरकारने ४० कोटी रुपये मंजूर केला आहे. या संशोधन केंद्रावर राज्यातील व राज्याबाहेरील शास्त्रज्ञ, इतर वरिष्ठ अधिकारी, विद्यापीठातील वरिष्ठ अधिकारी, कृषी विभागातील अधिकारी व शास्त्रज्ञ सतत भेट देत असतात. राज्यभरातून शेतकऱ्यांचेही अभ्यास दौरे येथे आयोजित करण्यात येतात. प्रक्षेत्रावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीही राहण्याची योग्य सोय नव्हती त्यामुळे सुसज्ज प्रशासकीय भवन, अतिथीगृह आणि कर्मचारी निवासाची गरज होती. या निधीतून नवीन प्रशासकीय भवन, कर्मचारी निवासस्थान, शेतकरी प्रशिक्षण केंद्र तथा अतिथीगृहाचे बांधकाम केले जाणार आहे.
पाडेगाव ऊस संशोधन केंद्र महाराष्ट्रातील ऊस संशोधन कार्याचे प्रमुख केंद्र आहे. १९३२ मध्ये याची स्थापना झाली आणि ते महात्मा फुले कृषी विद्यापीठा, राहुरीच्या अंतर्गत काम करते. पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने आतापर्यंत उसाच्या अनेक जाती विकसित केल्या आहेत, ज्यांचा महाराष्ट्रातील ऊस उत्पादनात मोठा वाटा आहे. केंद्राची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात १९३२ मध्ये झाली होती. मंजूर झालेल्या निधीतून नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी १४ कोटी ९२ लाख ५६ हजार रुपये, कर्मचारी निवासस्थानाच्या बांधकामासाठी ११ कोटी १२ लाख २८ हजार रुपये आणि शेतकरी प्रशिक्षण केंद्र तथा अतिथीगृहाच्या बांधकामासाठी १४ कोटी ८६ लाख २७ हजार रुपये अशी ४० कोटी ९१ लाख १० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यांनी विकसित केलेल्या काही प्रमुख जातींमध्ये फुले ऊस ८६०३२, फुले ऊस ०२६५, फुले ऊस १०१, आणि फुले ऊस ९०५७ यांचा समावेश आहे.