मलेशियाने साखरेच्या तुटवड्याचा मुद्दा सोडविण्यासाठी आणि कमोडीटीच्या किमती स्थिर राखण्यासाठी एका कॅबिनेट समितीची स्थापना केली आहे, असे Malaysian National News Agency बर्नामाने म्हटले आहे.
देशांतर्गत व्यापार मंत्री सलाउद्दीन अयुब यांचा हवाला देताना या माध्यमसमुहाने म्हटले आहे की, या समितीमध्ये अर्थ, अर्थव्यवस्था आणि उद्योग मंत्रालयाचाही समावेश आहे. साखर टंचाई बाबतच्या उपाय योजनेसाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाला देण्यासाठी समितीला एक महिन्याचा कालावधी दिला जाईल.
अलिकडे प्रसारीत झालेल्या विविध वृत्तांनुसार, साखर कारखाने आणि वितरण केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन सुट्ट्यांमुळे केलंटान आणि टेरेंगानूमध्ये ग्राहकांना साखर तुटवड्याचा सामना करावा लागला आहे. त्याबाबत उपाय योजना करण्यासाठी मलेशियन सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत.












