बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आतापर्यंत एकूण ८१ अर्ज निवडणूक कार्यालयात दाखल झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने यांनी ही माहिती दिली. कारखान्याच्या निवडणुकीत बारामती आणि पणदरे गटात सर्वाधिक प्रत्येकी १५ उमेदवारी अर्ज दाखल झालेत. विशेषतः सांगवी गटातून अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी, बुधवारी १२ तर दुसऱ्या दिवशी, गुरुवारी (ता. २२) ६९ अर्ज दाखल झाले आहेत.
कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भाजप पक्षासह विविध संघटनेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी अर्ज दाखल करण्यात आघाडी घेतली आहे. गुरुवारी राजेंद्र बुरुंगले, श्रीहरी येळे, अशोकराव सस्ते, प्रवीण वाघमोडे, अरविंद बनसोडे, विनोद जगताप, नारायण कोकरे, कुलभूषण कोकरे, अमित जगताप, अभय जगताप, विक्रम कोकरे, रामदास आटोळे, विलास सस्ते, मिथुन आटोळे आदींनी उमेदवारी जाहीर केली. नीरावागज गटातून अविनाश देवकाते, राजेश देवकाते, गणपत देवकाते, विठ्ठलराव देवकाते, तुकाराम गावडे, गुलाबराव गावडे, दिलीप ढवाण, भालचंद्र देवकाते (नीरावागज), जवाहर इंगुले (बारामती), बापूराव गायकवाड (सोनकसवाडी), उज्ज्वला कोकरे, गीतांजली जगताप, राजेश्री कोकरे, राणी देवकाते, रवींद्र थोरात (शारदानगर), रामचंद्र नाळे, भरत बनकर (उंडवडी), तुकाराम गावडे, कुलभूषण कोकरे, विठ्ठल देवकाते, मिथुन आटोळे यांनी अर्ज दाखल केले आहेत.