नवी दिल्ली : इंधन वितरण कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोल, डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. पेट्रोल, डिझेलचा दर सलग २९ व्या दिवशीही स्थिर आहेत. लोकांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. तर ब्रेंट क्रूडचा दर ११० डॉलर प्रती बॅरलवर आहे. देशात सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये ९१.४५ रुपये तर डिझेल ८५.८३ रुपये लिटर आहे. तर महागडे पेट्रोल परभणीत १२३.४७ रुपये प्रती लिटर आहे. आंध्र प्रदेशातील चित्तूरमध्ये १०७.६८ रुपये प्रती लिटर दराने देशातील सर्वात महागडे डिझेल मिळत आहे.
लाइव्ह हिंदूस्थान डॉट कॉमवर प्रकाशित वृत्तानुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोल १०५.४१ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ९६.६७ रुपये प्रती लिटर आहे. मुंबईत पेट्रोल १२०.५१ रुपये आणि डिझेल १०४.७७ रुपये प्रती लिटर आहे. कोलकातामध्ये एक लिटर पेट्रोल ११५.१२ रुपये आणि डिझेल ९९.८३ रुपये आहे. तर चेन्नईत पेट्रोल ११०.८५ आणि डिझेल १००.९४ रुपये प्रती लिटरने विक्री होत आहे. राजस्थानच्या श्री गंगानगरमध्ये पेट्रोल १२२.९३ रुपये तर डिझेल १०५.३४ रुपये लिटर आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये पेट्रोल ११८.१४ रुपये तर डिझेल १०१.१६ रुपये प्रती लिटर आहे. तर पाटणामध्ये पेट्रोल, डिझेल अनुक्रमे ११६.२३ आणि १०१.०६ रुपये प्रती लिटर आहे.












