नांदेड : अनुसयाबाई ढगे पाटील गुळ पावडर व खांडसरी साखर कारखाना उभारणीचे काम गतीने सुरू आहे. या कारखान्याची दररोज तीन हजार मे. टन ऊस गाळप क्षमता असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची गळचेपी थांबणार आहे. येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळेल. हा कारखाना शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरेल, असे प्रतिपादन खासदार नागेश पाटील-आष्टीकर यांनी केले. कारखान्याच्या यंत्र पूजन समारंभात ते बोलत होते. अनुसयाबाई ढगे व उद्योजक दादाराव ढगे- पाटील व मान्यवरांच्या हस्ते यंत्रपूजन करण्यात आले.
खासदार आष्टीकर म्हणाले की, हा कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विकासात नवा टप्पा आणेल. दादाराव ढगे यांनी प्रास्ताविक केले. प्रणिती देवरे चिखलीकर, शिरीष गोरठेकर, प्रा. संदीपकुमार देशमुख बारडकर, रावणगावकर आणि सागर कोंडेकर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक श्यामराव पाटील-वैजापूरकर व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्यामराव पाटील टेकाळे यांनीही हजेरी लावली. ढगे यांच्या खासगी तत्त्वावरील कारखान्याचा पहिला शेअर गोपाळराव देशमुख-चिकाळेकर यांनी घेण्याचा मानस व्यक्त केला. जीवनराव घोगरे, बाळासाहेब रावणगावकर, सुभाष किन्हाळकर, तिरुपती पाटील कोंडेकर, प्रकाशराव भोसीकर, बालाजी गोडसे, शामराव पाटील टेकाळे, बबन बारसे, प्रवीण गायकवाड, प्रतापराव बारडकर, सुनील वानखेडे, प्रा. संदीपकुमार देशमुख, बाळासाहेब डोंगरे, शशी पाटील, पिंटू पाटील आदी उपस्थित होते.