नांदेड : शेतकऱ्यांच्या खात्यावर २ हजार ७०० रुपये जमा, ‘कुंटूरकर साखर’ने मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांना केले खूश

नांदेड: नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील कुंटूरकर शुगर आँण्ड आँग्रो कारखान्याचा २०२५-२६ चा ११ वा गाळप हंगाम थोडा उशिरा चालू झाला, पण ऊस गाळपमध्ये अतिशय चांगला प्रतिसाद देत तब्बल ४५ दिवसांत १ लाख ६० हजार ऊस क्रेसिंग केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या ऊस बिलांचा पहिला हप्ता प्रति टन २ हजार ७०० रूपये शेतकऱ्यांच्या खात्यावर मकरसंक्रातीच्या मुहूर्तावर जमा करण्यात आला आहे. कारखान्याचे चेअरमन राजेश देशमुख म्हणाले की, आपण कुठल्याही कारखान्यांची स्पर्धा करत नाही तर नेहमी शेतकऱ्यांच्या कष्टांचा विचार करतो. शेतकऱ्यांनी उन्नती करण्यासाठी उसाचे जास्तीत जास्त नवीन लागवड करावी. आपला ऊस कुंटूरकर शुगर अँड अँग्रो या आपल्या साखर कारखाना गाळपाकरिता कटिवद्ध असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

आपली ऊसतोड यंत्रणा आपल्या भागातील शेवटचे फड ऊसतोडणी करूनच कारखाना बंद करेल. आपला ऊस गाळपास लवकर व्हावे वाटते, पण योग्य वेळीच ऊसतोडणी केली जाते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस उशिरा तुटेल व वजन घटेल अशी चिंता करू नये. आपला ऊस कुंटूरकर शुगर घेऊन जाईल. नंतरच गाळप बंद होईल, असेही चेअरमन देशमुख-कुंटूरकर म्हणाले. यावेळी मुख्य सल्लागार उद्धवराव पंतगे, सुनील रामदासी यांनी प्रकाशित केलेल्या श्री तुळजाभवानी व कारखान्याच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन चेअरमन राजेश देशमुख कुंटूरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here