नांदेड : सुभाष शुगरसह शिऊर साखर कारखान्याची गळीत हंगामासाठी जय्यत तयारी

नांदेड : हदगाव तालुक्यातील हडसणी येथील श्री सुभाष शुगर प्रायव्हेट लिमिटेड आणि कळमनुरी तालुक्यातील वाकोडी येथील शिऊर साखर कारखाना या दोन्ही साखर कारखान्यांचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा चेअरमन सुभाषराव देशमुख यांच्या हस्ते पार पडला. श्री सुभाष शुगर कारखान्याने मागील काळात वीज निर्मिती प्रकल्प उभारून तयार होणाऱ्या दोन कोटी युनिट वीजेचा महावितरणला पुरवठा सुरू केला आहे. तर शिऊर इको प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून १६ टी. पी. डी. क्षमतेच्या बायो-सीएनजी प्रकल्प राज्यातील सर्वाधिक क्षमतेचा बायो- सीएनजी प्रकल्पाच्या लवकरात लवकर उभारणीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे चेअरमन सुभाषराव देशमुख यांनी सांगितले.

यावेळी देशमुख म्हणाले की, कारखान्याने अडचणीच्या काळातही ऊस नेण्याचा दिलेला शब्द पाळला. प्रत्येक शेतकऱ्याचा ऊस नेला. त्यामुळे दोन्ही कारखान्यांप्रती शेतकऱ्यांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. शिऊर इको प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून वाकोडी (ता. कळमनुरी, जि. हिंगोली) येथे १६ टी. पी. डी. क्षमतेच्या बायो- सीएनजी प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. नुकतेच या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले आहे. हा प्रकल्प लवकर उभारला जाईल. यावेळी संचालक यशवंत देशमुख, मधुकर पतंगे, सोमप्पा, राजेश मानधना, कराळे, शेती अधिकारी किशोर वानखेडे, जाधव व इतर विभागप्रमुख, खातेप्रमुख तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here