नांदेड : ऊस तोडणी, वाहतुकीसाठी सर्वाधिक ११८४.४४ रुपये प्रति टन खर्च,

नांदेड : नांदेड प्रादेशिक विभागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गाळप हंगाम २०२४-२५ या वर्षाच्या ऊसतोडणी व वाहतूक खर्चाची माहिती देण्यात आली आहे. अग्रोवनमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शुगर अँड एनर्जी लि. माखणी कारखान्याचा ऊस तोडणीचा प्रती टन खर्च ११८४.४४ रुपये आहे. नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांचा ऊस तोडणी खर्च प्रती टन ८४६ ते ९१० रुपये दरम्यान आहेत. विभागातील साखर कारखान्यांच्या तोडणी, वाहतूक दराची माहिती जाहीर करण्यात आली असून शेतकऱ्यांनी हा खर्च वाजवी असल्याची खात्री करावी, असे आवाहन नांदेडचे प्रादेशिक उपसंचालक (साखर) विश्वास देशमुख यांनी केले आहे.

प्रादेशिक उपसंचालकांनी सांगितले की, जर शेतकऱ्यांना सरासरी ऊसतोडणी व वाहतूक खर्च जास्त वाटत असेल तर संबंधित कारखान्याच्या कार्यक्रमानुसार शेतकऱ्यास स्वतः ऊसतोडणी करून गाळपासाठी नेता येईल. नांदेड जिल्ह्यातील प्रातिनिधीक ऊस तोडणी दरावर नजर टाकली असता असे दिसून येते की, भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचा तोडणी दर ८८८.३८ रुपये प्रति टन, तर श्री सुभाष शुगर प्रा. लि. हदगावचा तोडणी दर ८८८.३८ रुपये प्रति टन आहे. एमव्हीके अँग्रो फूड्स प्रॉडक्टस् लि. वाघलवाडा कारखान्याचा दर ९०६.५७ रुपये प्रति टन आहे. कुंटुरकर शुगरचा दर ९५०.३६ रुपये प्रति टन आहे. हिंगोलीतील श्रीलक्ष्मी नृसिंह शुगर एलएलपी अमडापूर कारखान्याचा दर १०२१.७२ रुपये प्रति टन, ट्वेंन्टीवन शुगर लि. सायखेडाचा दर १०६५.६६ रुपये प्रति टन आहे. ओंकार साखर कारखाना लि., अंबुलगा कारखान्याचा दर ११५३.८४ रुपये प्रति टन आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here