नांदेड : व्हीपीके उद्योग समूहातर्फे तीन लाख मेट्रिक टनांवर ऊस गाळप

नांदेड : शेतकरी नेते तथा व्हीपीके उद्योग समूहाचे अध्यक्ष मारोतराव कवळे यांच्या आणि नेतृत्वात समूहाचे सीईओ संदीप पाटील-कवळे यांच्या मार्गदर्शनात २९ डिसेंबरपर्यंत व्हीपीके कारखाना सिंधी, डॉ. शंकरराव चव्हाण जागरी गूळ पावडर कारखाना कुसुमनगर आणि एम.व्ही. के. साखर कारखाना कुसुमनगर वाघलवाडा या तिन्ही कारखान्यांत एकूण ३,००,९४१ मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले.

यंदाच्या हंगामात ऊस गाळपासाठी आवश्यक यांत्रिक तयारी, वेळापत्रकानुसार ऊस उचल, वाहतूक व्यवस्थापन तसेच कारखान्यांतील शिस्तबद्ध कार्यपद्धतीवर विशेष भर देण्यात आला. त्यामुळे गाळप प्रक्रिया सुरळीत पार पडली. कारखान्यांचे अधिकारी, कर्मचारी, कामगार, वाहतूक ठेकेदार, तोड ठेकेदार आणि शेतकरी यांच्या सामूहिक प्रयत्नातूनच हे शक्य झाल्याचे अध्यक्ष मारोतराव कवळे गुरुजी यांनी सांगितले. पुढील काळातही शेतकरी हिताचे धोरण राबवत अधिक कार्यक्षमतेने काम करण्याचा निर्धार व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here