नंदुरबार : जिल्ह्यात ऊस पिकामध्ये आंतरमगाशतीच्या कामांना गती

नंदुरबार : नंदुरबारमध्ये सुमारे १६ हजार हेक्टवर ऊस पीक आहे. इतर शेतीमालाला खर्चाच्या तुलनेने मिळणारे कवडीमोल दर, मजूरटंचाई यामुळे अनेक शेतकऱ्यांनी ऊस लागवडीला पसंती दिली आहे. खानदेशात तळोदा, शहादा, धुळ्यातील शिरपूर, जळगावातील चोपडा, चाळीसगाव, यावल आदी तालुक्यांत कूपनलिकांच्या सहाय्याने उसाची शेती केली जाते. विविध कडधान्यांचे उत्पादन घेतले जाते. नंदुरबारमध्ये चार कारखाने आहेत. त्यामुळेही लागवडीला बळ मिळाले आहे. सध्या ऊन कमी झाल्याने सध्या शेतकरी पिकात आंतरमशागत किंवा तणनियंत्रण, खते देण्याचे काम करीत आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातील काही भागांत पाणीटंचाईची स्थिती होती. मात्र, गेल्या १५ दिवसांत अनेक दिवस कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअसपेक्षा कमी राहिले आहे. अनेकदा दुपारीदेखील तापमान ३५ अंश सेल्सिअस एवढे असते. याचा लाभ पीकवाढीस होत असून, शेतकरीदेखील त्यासंबंधी कार्यवाही करून घेत आहेत. मेमध्ये हा सिंचनाचा ताण कमी दिसत आहे. जळगावात उसाखाली सुमारे १४ हजार हेक्टर एवढे क्षेत्र आहे. तसेच धुळ्यातली पाच हजार हेक्टरवर ऊस आहे. नंदुरबारमधील तळोदा व शहादा तालुक्यात पाण्याची उपलब्धता पाहता बहुतांश बागायतदार शेतकऱ्यांनी पूर्वहंगामी व सुरू हंगामातील उसाची लागवड केली आहे. शहादा तालुक्यात सुमारे आठ हजार हेक्टरवर ऊस पीक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here