नाशिक : रावळगाव साखर कारखाना नव्या जोमाने तिसऱ्या गळीत हंगामासाठी सज्ज झाला आहे. रावळगाव साखर कारखान्याला त्याचे पुनर्वैभव मिळवून देवू. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विश्वासाला व अभिमानाला तडा जाऊ देणार नाही, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष बबनराव गायकवाड यांनी केले. कारखान्याचा तिसरा बॉयलर पूजन व अग्नी प्रदिपन सोहळा उत्साहात झाला. यावेळी ते बोलत होते. भाडणे (ता. साक्री) येथील सरपंच अजय सोनवणे व सिमरन सोनवणे यांच्या हस्ते बॉयलर पूजन करण्यात आले.
गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी साक्री तालुक्यातील भांडणे येथील साखर कारखाना घेतला आहे. त्याच्या बॉयलर अग्नि प्रदीपनप्रसंगी अध्यक्ष गायकवाड म्हणाले, की, शेतकरी बांधवांनी उसाची प्रचंड प्रमाणात लागवड करावी. हमी भावासोबतच योग्य वेळेत उस तोडणी करून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कटीबद्ध आहे. यावेळी कारखान्याचे सचिव शिवाजीराव कामठे, संचालक कुंदन चव्हाण, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गरुड, माजी सरपंच भास्कर पवार, शेतकरी दिलीप जाधव, गोकुळ पवार, राजेंद्र पवार, नारायण पवार, उन्मय चव्हाण, कैलास कदम, भाऊसाहेब सूर्यवंशी, किशोर माळी, शेख कय्युम आदी प्रमुख पाहुणे होते. सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गरुड, गोकुळ पवार यांची भाषणे झाली. कारखान्याचे संचालक कुंदन चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. सुभाष मोहिते यांनी आभार मानले. गुलाब देवरे, विश्वास सूर्यवंशी, प्रदीप सूर्यवंशी, भास्कर शिरसाट, करण भाटे, कौस्तुभ शिंदे, रुपाली पाटील, हर्षल खरे, ययाती मारवाळ आदी उपस्थित होते.