नाशिक : केजीएस शुगरच्या पहिल्या गाळप हंगामाला प्रारंभ; चार लाख टन गाळपाचे उद्दिष्ट

नाशिक : पिंपळगाव निपाणी येथील केजीएस शुगर अँड इन्फ्रा कॉर्पोरेशन लिमिटेड या साखर कारखान्याच्या २०२५-२६ या वर्षातील पहिल्या गाळप हंगामाचा शुभारंभ रविवारी करण्यात आला. सहा वर्षांहून अधिक काळ बंद असलेला कारखाना कृषी उद्योजक संजय होळकर यांच्या ग्रेनॉच इंडस्ट्रीज समूहाने ऑक्टोबर २०२५ मध्ये एनसीएलटीमार्फत विकत घेऊन त्याचे कामकाज पुन्हा सुरू केले. चेअरमन संजय होळकर आणि वैशाली होळकर यांच्या हस्ते काटा पूजन करण्यात आले. कारखान्याने यंदा सुमारे चार लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे.

‘नाफेड’चे माजी संचालक व कारखाना अध्यक्ष चांगदेवराव होळकर, चेअरमन संजय होळकर यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी व संचालक मंडळाच्या हस्ते गव्हाणीत उसाची पहिली मोळी टाकण्यात आली. चेअरमन होळकर म्हणाले की, नवीन व्यवस्थापनाने मागील काळात थकीत असलेल्या ७७६ ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सुमारे ६.५ कोटी रुपयांहून अधिक रक्कम तीन टप्प्यांमध्ये अदा केली आहे. मागील थकीत ६.५ कोटी रुपये अदा करून आम्ही विश्वास निर्माण केला आहे. सोहळ्याला संचालिका सोनिया होळकर, संचालक सत्यजित होळकर, संचालक प्रकाश दायमा, कार्यकारी संचालक आदित्य होळकर यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य, कारखान्याचे जनरल मॅनेजर सुखदेव शेटे, जनरल मॅनेजर घोरपडे, वसंत शिंदे, शेतकी अधिकारी पटेल, देसले, डॉ. वसंत शिंदे, निरंजन होळकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here