नाशिक: येथील कादवा सहकारी साखर कारखाना लि.साखर कारखान्याचा ४९ वा गळीत हंगाम शुभारंभ सोहळा गुरुवारी (दि. ३० ऑक्टोबर) होणार आहे. सकाळी दहा वाजता अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे, खासदार भास्करराव भगरे, आमदार सौ. व श्री. विक्रांत पाटील, डॉ. राहुल आहेर आणि आमदार दिलीपराव चौधरी (संधान), चिंचखेड, सौ. व श्री. बनकर यांच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस साखर कारखान्याला पाठवावा, असे आवाहन चेअरमन श्रीराम शेटे यांनी केले. शेतकऱ्यांनी एकरी ऊस उत्पादन वाढवण्याची गरज आहे. त्यासाठी कारखाना शेतकऱ्यांना मदत करत आहे, असे ते म्हणाले. या कार्यक्रमांस उपस्थित राहण्याचे आवाहन व्हा. चेअरमन शिवाजीराव बस्ते, सौ. व श्री. विजय पाटील व संचालक मंडळाने केले आहे.












