नाशिक : द्वारकाधिश साखर कारखान्याला निमगाव ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाच्या केबीएच इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च मालेगाव या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक उपक्रमांतर्गत भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी कारखान्यामध्ये उसापासून साखर तयार करण्याची प्रक्रिया तसेच साखरेची पॅकेजिंग, इथेनॉल निर्मिती व तसेच पाण्याचा पुर्नवापराची माहिती घेतली.
या औद्योगिक भेटीप्रसंगी एमबीए प्रथम वर्ष व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे पदाधिकारी अद्वय हिरे, आर. के. देवरे, संजय गरुड व जीवन हिरे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. यावेळी संस्थेचे कार्यवाहक संचालक डॉ. समाधान बनसोडे, कार्यालयीन अधीक्षक भास्कर पवार, चंद्रशेखर वाघ, प्रा. काजल दुबे, रिंकू पाटील, गौरव पाटील, निंबा देवरे, विशाल मोरे, प्रकाश भदाणे यांसह विद्यार्थी उपस्थित होते. त्यांनी साखर उत्पादनाची प्रक्रिया जाणून घेतली.

















