नाशिक : साखर उद्योगातील कामगारांना नवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन प्रख्यात साखर तंत्र सल्लागार वाळू आहेर यांनी केले. अमृतनगर-संगमनेर येथे सहकार तंत्रमहर्षी भाऊसाहेब थोरात ससाका लिमिटेड अंतर्गत नवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कारखान्याचे उपाध्यक्ष श्री. घुले पाटील होते. आहेर यांनी यावेळी मिल शून्य टक्के बंद आणि हाय प्रेशर बॉयलर नवीन तंत्रज्ञान या विषयांवर मार्गदर्शन केले.
यावेळी वाळू आहेर यांनी कारखाना सुरळीत चालविण्यासाठी सिझन ऑफ सिझनमध्ये कारखाना, बॉयलर, बायलींग हाऊससह प्रत्येक मशिनरीवर करावयाच्या उपाययोजना सर्व तपशीलासह समजून सांगितल्या. कार्यकारी संचालक श्री. घुगरकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. कार्यक्रमास चिफ इंजिनीयर गडाख, चिफ केमिस्ट अनिल पाटील, सर्व इंजिनीयर, केमिस्ट, स्कील्ड स्टाफ, सर्व सुपरवायझर आणि कामगार वर्ग उपस्थित होते. कार्यकारी संचालक घुगरकर यांनी आभार मानले.