नाशिक : कादवा कारखाना कार्यस्थळावर मिनी मॅरेथॉन स्पर्धा, मोफत रक्त तपासणी, मोफत रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिर असे सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार व कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांच्या वाढदिनी यांचे आयोजन केले होते. यावेळी ऊसतोड मजूर व कुटुंब, कादवा कामगार व कुटुंबाची यांची मोफत अस्थिरोग निदान व उपचार तसेच फिजिओथेरपीचे उपचार देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ऊसतोड कामगारांना ब्लँकेट वाटप करण्यात आले. मविप्र वैद्यकीय महाविद्यालय व सुयोग हॉस्पिटलच्या सहकार्याने रक्तदान शिबिर, मोफत रक्तगट तपासणी व आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.
मिनी मॅरेथॉन स्पर्धेत कर्मवीर रा. स. वाघ विद्यालयातील ललित झोटिंग, निकेत पवार, मोहन वाघले, चंदना घोडे, शुभांगी शेवरे, गायत्री कावळे, निखिल भवर, रुद्र जाधव, संदीप धुळे, साक्षी भोई, माधुरी भवर, अक्षरा गायकवाड यांनी यश मिळवले. मविप्र वैद्यकीय महाविद्यालय मातेरेवाडीचे पथक, पिंपळगाव बसवंतचे डॉ. नीलेश शेटे कार्यकारी संचालक (सुयोग हॉस्पिटल) आदींनी वैद्यकीय तपासणी केली. कादवा कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, उपाध्यक्ष शिवाजी बस्ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय पाटील, तालुकाध्यक्ष रामदास पिंगळ, संचालक मधुकर गटकळ, रावसाहेब पाटील, बापू पडोळ, दिनकर जाधव, रघुनाथ जाधव, सरपंच दत्तात्रय गटकळ, उद्योजक ललित जाधव, राहुल कावळे, भगवान जाधव आदी उपस्थित होते.

















