राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) प्रमुख शरद पवार यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. शहा यांची देशातील पहिले सहकार मंत्रीपदी झालेल्या निवडीबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्याचे पवार यांनी सांगितले. माजी केंद्रीय मंत्र्यांनी ट्विटरवर सांगितले की, देशातील साखर उद्योगाची परिस्थिती आणि अतिरिक्त साखर उत्पादनातून निर्माण झालेल्या समस्यांबाबत चर्चा झाली आहे.
पवार यांनी ट्विट केले आहे की, साखर उद्योगातील सहकार क्षेत्रासमोर येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करण्यासाठी मी नवी दिल्लीत नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेडचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर आणि प्रकाश नाईकनवरे यांच्यासोबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी छोटी बैठक झाली.
त्यांनी पुढे म्हटले आहे की, सर्वात पहिल्यांदा अमित शहा यांच्या भारताचे पहिले सहकार मंत्र्यांच्या रुपात झालेल्या नियुक्तीबद्दल मी त्यांचे अभिनंदन केले. बैठकीवेळी आम्ही देशातील साखर उद्योगाची सद्यस्थिती आणि अतिरिक्त साखर उत्पादनामुळे होणाऱ्या समस्यांबाबत चर्चा केली.
राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख पवार यांनी सांगितले की, दोन महत्त्वाचे मुद्दे शहा यांच्यासमोर मांडण्यात आले आहेत. साखरेचा किमान विक्री दर (एमएसपी) आणि साखर कारखान्यांच्या परिसरात इथेनॉल निर्मिती युनिट स्थापन करण्याच्या प्रस्तावाबाबत शहा यांच्याशी चर्चा झाली. आम्हाला अपेक्षा आहे की, सहकार मंत्री लवकरच या मुद्यांवर विचार करतील आणि त्यावर तोडगा शोधण्याचा प्रयत्न करतील असे पवार यांनी म्हटले आहे
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link


















