पाकिस्तानकडून 1 लाख मेट्रिक टन सफेद रिफाईंड साखर खरेदीसाठी नवीन आंतरराष्ट्रीय निविदा जारी

इस्लामाबाद : युरोपियन व्यापाऱ्यांकडील माहितीनुसार, पाकिस्तानच्या सरकारी मालकीच्या ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ पाकिस्तान (टीसीपी) ने गुरुवारी 1 लाख मेट्रिक टन सफेद रिफाइंड साखर खरेदी करण्यासाठी एक नवीन आंतरराष्ट्रीय निविदा जारी केली आहे. रॉयटर्सने याबाबतचे वृत्त दिले आहे. या निविदेसाठी बोली लावणाऱ्यांना 8 सप्टेंबरपर्यंत त्यांच्या किंमतीच्या ऑफर सादर कराव्या लागतील. नवीन निविदेवरून असे दिसून येते की, या आठवड्याच्या वाटाघाटींमध्ये टीसीपीने मागील 2 लाख टन साखरेच्या निविदेच्या पुढे आणखी कोणतीही खरेदी केली नाही. टीसीपी फक्त 30 हजार टन साखर मिळवू शकली.

सरकार साखरेच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी, साखरेच्या साठ्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. अनेक अज्ञात कारखानदारांना एक्झिट कंट्रोल लिस्टमध्ये टाकले आहे. पाकिस्तान सरकारने साखरेच्या किरकोळ किमतीत झालेल्या तीव्र वाढीनंतर, किंमत स्थिरता राखण्यासाठी 5 लाख टन साखर आयात करण्याची योजना मंजूर केली आहे. तर, पाकिस्तान स्पर्धा आयोग (सीसीपी) सध्या 79 साखर कारखाने आणि पाकिस्तान साखर कारखाना असोसिएशन (पीएसएमए) यांच्याशी संबंधित कार्टेलायझेशन प्रकरणाची सुनावणी करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here