कोरोनावायरस ला घाबरु नका, योगाभ्यास करा: रामदेव बाबा

नवी दिल्ली : योग गुरु रामदेव बाबा यांनी शनिवारी लोकांना कोरोनावायरस बाबत बोलताना सांगितले की, या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी आवश्यक ती सावधानी बाळगा. घाबरुन जाऊ नका.

ते म्हणाले, जेव्हा तुम्ही सार्वजनिक ठिकाणी असता किंवा बस, रेल्वे आणि विमानाने प्रवास करता तेव्हा आपले हात स्वच्छ ठेवण्यासाठी सॅनिटायझर चा वापर करावा. तसेच इतर व्यक्तींपासून 4 ते 5 फुटांचे अंतर ठेवावे. तसेच मास्क वापरणे ही महत्वाचे आहे.

ते म्हणाले, मी लोकांना रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी योग साधना आणि प्राकृतिक जीवन शैलीचे पालन करण्याचा आग्रह करतो.

Audio Player

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here