गेल्या काही वर्षांपासून साखर उद्योगाला उसतोड मजुरांच्या टंचाईची मोठी समस्या भेडसावत आहे. त्यात भरीस भर म्हणून उसतोड मजूर पुरविण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांच्या फसवणुकीचे प्रकार दरवर्षी घडत आहेत. या सर्वाला पर्याय म्हणून उसतोड करण्यासाठी हार्वेस्टरचा पर्याय पुढे आला. त्यामुळे साखर कारखानदार आणि शेतकरी दोघानांही काही प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र बाजारात उपलब्ध असलेले हार्वेस्टर मोठ्या क्षमतेचे आणि जास्त किमतीचे आहेत. त्यामुळे त्याची खरेदी आणि वापर सर्वानाच शक्य नाही.
ऊस दर विनिमय कायद्यानुसार उत्पादक शेतकऱ्यांनी पिकविलेला ऊस स्वत: तोडणी वाहतुक करून आणूण कारखान्यास पुरवठा करण्याची तरतूद आहे. गुजरात व अन्य राज्यामध्ये अशी पध्दत प्रचलित आहे. तथापि, आपल्या राज्यामध्ये ऊस तोडणी ओढणीची जबाबदारी ऊस उत्पादकांच्यावतीने साखर कारखाने घेत आहेत. यासाठी कित्येक वर्षे ऊस तोडीसाठी लागणारे मजूर हे बीड, उस्मानाबाद, सांगोला, जत वगैरे दुष्काळी भागातून मुकादममार्फत पुरवले जातात. त्यासाठी गाळप हंगाम सुरु होण्यापूर्वी अशा मुकादमाबरोबर कारखान्याकडून करार केले जातात.
करार करताना हंगामामध्ये होणाऱ्या कामाच्या बिलापोटी वाहन निहाय उचल रकमा आदा केल्या जातात. ही रक्कम कोट्यवधी रुपयामध्ये असते. कारखाने त्या रक्कमा बँकेकडून कर्जे घेवून आदा करतात. कारखान्याच्या गाळप क्षमतेच्या प्रमाणात २० ते ५० कोटीपर्यंत अशा रक्कमांचे वाटप केले जाते. राज्यात गळीत करणाऱ्या २०० कारखान्यात ६० हजार वाहन मालक, ५० ते ५५ हजार मुकादम आणि १० लाखाच्या आसपास उसतोडणी कामगार कार्यरत असतात. साखर आयुक्तालयाकडून “महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूकदार” हे नवीन मोबाईल अॅप विकसित करून त्यामध्ये वाहतूकदार, मुकादम व ऊस तोडणी मजुरांची माहिती भरण्याचे काम सुरु केलेले आहे. यामुळे दुबार करार करण्याचे प्रमाण काही प्रमाणात कमी होईल.
गेल्या २/३ वर्षात दुष्काळी भागात पावसाचे प्रमाण समाधानकारक झालेले आहे. त्यामुळे या भागात पाण्याची उपलब्धता वाढू लागली आहे. मजुरांची मुले शिक्षित झाल्यामुळे ती ऊस तोडणी कामासाठी उपलब्ध होत नाहीत. एम.आय.डी.सी. उभारणी, प्रगत तंत्रज्ञान व स्थानिक पातळीवर नोकरीच्या संधी प्राप्त होऊ लागल्या आहेत. या सर्वांचा परिणाम तोडणी मजूर उपलब्धतेवर होऊन मजुरांची चणचण भासू लागली आहे. परिणामी आता ऊस तोडणीचे काम मशीनने करण्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही. परंतु यामध्येही काही अडचणी येत आहेत. राज्यात १ ते २ एकराचे आत जमीन असलेले जवळ जवळ ७५ ते ८० टक्के ऊस उत्पादक शेतकरी आहेत. जमीनीचे तुकडीकरण वाढतच चालले आहे.
लहान-लहान उसाच्या प्लॅाटमध्ये मोठे हार्वेस्टर वापरावर मर्यादा येते. त्याला आता कोल्हापूरच्या मातीतूनच पर्याय निर्माण झाला आहे. साखर कारखान्याचे मिल रोलर रिसेलिंगच्या क्षेत्रात प्रसिद्ध असलेली एसबी रिसेलर्स कंपनीने आता ऊस तोडणी यंत्रसामग्रीच्या क्षेत्रात यशस्वी पदार्पण केले आहे. त्यांच्या स्वदेशी ‘सीएच १७१८ प्रो हार्वेस्टर’ने बाजारात आल्यापासून १५० हून अधिक विक्रीचा विक्रम नोंदवला आहे. बाजारात असलेल्या इतर हार्वेस्टरपेक्षा हे मशिन तुलनात्मक दृष्टया उपयुक्त असल्याचा दावा एस. बी. रिसेलर्सचे तंज्ञाकडून करण्यात आला आहे.
‘CH 1718 प्रो’ हार्वेस्टर आहे कसा…
* अधिक कार्यक्षम
* अधिक मजबूत (हार्ड-बिल्ट)
* कमी किंमत
‘CH 1718 प्रो’ची खास वैशिष्ट्ये…
* शक्तिशाली इंजिन : १७४ एचपी इंधन-कार्यक्षम कमिन्स इंजिन, कठीण परिस्थितीतही उच्च कामगिरी करते.
* मजबूत बांधकाम : अतिरिक्त-कठीण क्रॉप डिव्हायडर प्लेट्स आणि मेटॅलिक एअर क्लीनरमुळे कोणत्याही प्रकारच्या भूभागावर चालते.
* ऑपरेटरसाठी आरामदायी टिल्टिंग केबिन
* बॅटरीवर चालणारे एसी आणि स्वतः साफ करणारे फीड रोलर्स.
* स्मार्ट तंत्रज्ञान : जीपीएस टेलिमॅटिक्सद्वारे रिअल-टाइम ट्रॅकिंग.
* उत्पादन वाढ: गळून पडलेला ऊस कापणी करताना कमी नुकसान, कार्यक्षम कापणीमुळे उत्पादनात वाढ.
अत्यंत महत्वाचे…
CH 1718 प्रोचे अन्य मशिनच्या तुलनेत फायदे असतील तर कारखाना स्तरावर त्याच्या चाचणी घेवून खात्री करणे सोयीचे होईल. कंपनी कोल्हापूरचीच असल्याने व त्यांचा रोलर रिसेलिंग कामातील अनुभव चांगला असल्याने तोडणी मजुरांचा प्रश्न मार्गी लागण्याच्या दृष्टीकेाणातून या मशिन्सच्या चाचणी घेवून खात्री करणे जरुरीचे वाटते.