कानपूर : इथेनॉल मिश्रण कार्यक्रमांतर्गत २०२३, २०२४ आणि २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये १२ टक्के, १५ टक्के आणि २० टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. २०२५ पर्यंत २० टक्के मिश्रण करण्यासाठी, रासायनिक उद्योग आणि इतर गरजांच्या पूर्ततेसाठी देशाला जवळपास १३,५०० मिलियन लिटर इथेनॉलची गरज भासेल. यापैकी जवळपास ७,००० मिलियन लिटर इथेनॉल साखर उद्योगाच्या फीड स्टॉकपासून उत्पादित करण्याचे उद्दिष्ट आहे. नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट (NSI) ने इथेनॉल उत्पादनासाठी साठवून ठेवलेल्या मोलॅसिसची गुणवत्ता टिकवण्याबाबत यशस्वी संशोधन केले. यातून देशातील सर्व साखर कारखान्यांना इथेनॉल उत्पादनास प्रोत्साहन मिळेल.
इथेनॉल उत्पादन वाढविण्यासाठी साखर उद्योग इथेनॉल उत्पादनासाठी मध्यवर्ती मोलॅसिस, बी हेवी मोलॅसिसचा वापर करीत आहे. मात्र, साखर कारखाने केवळ ५ ते ६ महिने सुरू असतात. आणि इथेनॉल युनिट वर्षभर चालवले जाते. त्यामुळे मोलॅसिस साठवण्याची गरज भासते. मात्र, साठवणुकीदरम्यान, जसजसा वेळ पुढे जाईल, तसतसा इथेनॉल उत्पादनासाठी आवश्यक मोलॅसिसची गुणवत्ता कमी होत जाते.
द टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, NSI चे असिस्टंट प्रोफेसर अशोक गर्ग म्हणाले की, मोलॅसिसच्या गुणवत्तेमधील घसरण रोखण्यासाठी संस्थेने साखर तंत्रज्ञान विभागात सुजलकेम टेक्नोलॉजीज, हैदराबाद यांच्याकडून खास रुपात विकसित नॅनो-बायोसाइड, एंजाइमॅटिक नायट्रोजन स्रोत, डिस्पर्सेंट आणि ऑक्सीजन स्केवेंजरटा वापर करून अभ्यास करण्यात आला. ते म्हणाले की, आम्ही विविध क्षेत्रापासून बगॅसचे नुमने जमा केले आमि साखर कारखान्यांप्रमाणे त्यावर प्रक्रिया केली. त्यातून वॉटर जॅकेट्स आणि सर्क्युलेशन सिस्टीमचे स्टील टँक तयार करण्यात आले.
एनएसआयचे संचालक प्रोफेसर नरेंद्र मोहन यांनी सांगितले की, नऊ महिन्यांच्या साठवणुकीनंतर हा निष्कर्ष समोर आला आहे की, या सुत्राचा वापर करुन मोलॅसीसपासून साखरेचा नुकसान कमी करणे अधिक प्रभावशाली असेल. आणि अशा प्रकारे उच्च इथेनॉल उत्पादन शक्य आहे. आम्ही साखर उद्योगासोबत मोठ्या प्रमाणात काम केले आहे. कारण, भांडारातील साखरेचे नुकसान कमी करण्यासाठी टँकमध्ये मोलॅसिसचे पुनर्चक्रण, थंड करणे आणि मोलॅसिसमध्ये उच्च सामग्री ठेवणे यांसारख्या उपायांचा समावेश करता येईल.
ते म्हणाले की, या उपायांसह आणि रसायनांचे अशा प्रकारेच मिश्रण लागू केल्यानंतर जर उत्पादनात केवळ ३ टक्के वाढ होत असेल तर यापासून जवळपास २०० मिलियन लिटरपर्यंत इथेनॉलचे अतिरिक्त उत्पादन मिळू शकेल आणि दरवर्षी १,२०० कोटी रुपयांचे अतिरिकत उत्पन्न मिळेल.











