कोल्हापूर : दौलत साखर कारखान्याचा लीज करार होऊन ६ वर्षे झाली तरी अथर्व कंपनीने कामगारांची मान्य केलेली ३० कोटींची देणी दिलेली नाहीत. त्यामुळे या प्रश्नावर सोमवारी कार्यालयात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बैठक आयोजित केली होती. अथर्व शुगर्सच्या वतीने कंपनीचे प्रमुख बैठकीला येण्याऐवजी वकील अॅड. मुतालिक आल्याने चर्चा झाली नाही. अथर्व शुगरला देण्यांबाबतची भूमिका मांडण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली. पुढील बैठक २८ तारखेला होणार आहे.
सोमवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आयोजित बैठकीवेळी दौलत साखर कारखान्यातील कामगारांची देणी कधी, कशी देणार, अन्य मागण्यांबाबत पुढील पंधरा दिवसांत निर्णय घ्या, असा आदेश अथर्व शुगर्सच्या प्रशासनाला दिले. दौलत कारखान्याचे चेअरमन अशोक जाधव, कार्यकारी संचालक मनोहर हसुरकर, एम. ए. शेख, डी. एल. कराड, शेतकरी संघटना प्रतिनिधी सदानंद गावडे, चंदगड तालुका साखर कामगार युनियन, संघटनेचे जनरल सेक्रेटरी प्रदीप पवार, खजिनदार आबासाहेब चौगले, महादेव फाटक, विजय देवणे, उदय नारकर, सुभाष देसाई उपस्थित होते.