‘ओंकार’चा प्रतिटन ३,५५० रुपये ऊसदर, सांगली जिल्ह्यात उच्चांकी दर देणारा कारखाना : सरव्यवस्थापक जे. व्ही. माने-देशमुख

सांगली : रायगाव (ता. कडेगाव) येथील ओंकार शुगर अँड डिस्टिलरी पॉवर प्रा. लि. कारखान्याने चालू गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये गाळपास येणाऱ्या उसाला प्रतिटन ३ हजार ५५० रुपये ऊसदर देत असल्याची माहिती सरव्यवस्थापक जे. व्ही. माने-देशमुख यांनी दिली. त्यामुळे ‘ओंकार शुगर अँड डिस्टिलरी पॉवर’ हा जिल्ह्यात उच्चांकी ऊसदर देणारा कारखाना ठरला आहे.

माने-देशमुख म्हणाले, चालू गळीत हंगामात गळितास येणाऱ्या उसाला पहिला हप्ता प्रतिटन ३ हजार ४०० रुपये, तर दीपावलीसाठी दुसरा हप्ता प्रतिटन १५० रुपये देण्याचा निर्णय कारखाना व्यवस्थापनाने घेतला आहे. यापुढेही आपला कारखाना शेतकरीहितासाठी सर्वोत्तम निर्णय घेण्यास कटिबद्ध आहे.”

‘ओंकार शुगर’चा वजन काटा अचूक

‘ओंकार’चा वजन काटा अचूक आहे. कोणत्याही वजनकाट्यावर वजन करून उसाची वाहने घेऊन यावीत व कारखान्याच्या वजन काट्याची खात्री करावी, असे कारखाना व्यवस्थापनाच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे.”शेतकऱ्यांना गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये गाळपास आलेल्या उसाच्या टनेजनुसार कारखाना धोरणाप्रमाणे दीपावलीनिमित्त मोफत साखर वाटप करण्यात येईल,” असेही सरव्यवस्थापक माने-देशमुख सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here