कृष्णा कारखान्याच्या प्रगतीमध्येच आमचे यश : डॉ. सुरेश भोसले

सातारा : ६५ वर्षांच्या इतिहासात नवनवीन योजना, शेतकरी हिताचे निर्णय आणि प्रगतिशील वाटचाल हीच खरी कृष्णा कारखान्याची ओळख ठरली आहे. सर्वसामान्य शेतकरी व सभासदांना केंद्रबिंद मानून संस्था उभी केली आणि चालक सक्षम असेल तरच संस्था यशस्वी होते, हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे. कृष्णा कारखान्याच्या प्रगतीमध्येच आमचे यश आहे, असे प्रतिपादन अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी केले.

शेरे (ता. कराड) ग्रामस्थ, शेतकरी व सभासदांच्या वतीने कृष्णा कारखान्याने दिलेल्या उच्चांकी ३ हजार ३११ रुपयांच्या दराबद्दल कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले व संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला. डॉ. सुरेश भोसले म्हणाले, सत्ता मिळाल्यानंतर ती लोकहितासाठी वापरली पाहिजे, कृष्णा कारखान्याच्या प्रगतीमध्ये शेतकरी, कामगार व संचालक मंडळाचे निःस्वार्थ योगदान आहे. जबाबदारीने साथ दिल्याबद्दल सर्वांचे कौतुक आहे. अनुभव नसणाऱ्यांनी सत्ता मिळविल्यानंतर काय दिवे लावले आहेत, याची आपणास माहिती आहेच, असेही ते म्हणाले.

गावोगावच्या भजनी मंडळांना साहित्य खरेदीसाठी निधी देण्यात येणार आहे. त्यासाठी तालुक्यात लाभाथ्यांची रेकॉर्ड ब्रेक नोंदणी झाल्याची घोषणा आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी करताच टाळ्यांचा कडकडाट झाला. आमदार डॉ. अतुलबावा पोसले म्हणाले, दहा महिन्यांत कोट्यवधी निधी आणला असून, लवकरच एका वर्षाच्या कामाचा हिशेब जनतेसमोर ठेवणार आहे. मोफत साखर, घरपोच साखर योजना सुरू असून येत्या निवडणुकीत नवीन योजना जाहीर करून सभासदांना दिलासा देऊ, असेही आमदार डॉ. भोसले यांनी सांगितले.

यावेळी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यासह व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक बाजीराव निकम, धोंडीराम जाधव, वसंतराव शिंदे, श्रीरंग देसाई, सोसायटी चेअरमन राजेंद्र निकम, माजी पंचायत समिती बाळासो निकम, माजी सरपंच मोहनराव निकम, हर्षवर्धन मोहिते, पै. धनाजी पाटील, कराड दक्षिण मंडल अध्यक्ष शंकराव निकम, माजी सदस्य संजय पवार, सरपंच सुबराव पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here