लाहोर : साखर माफिया साखरेवरील निर्यात निर्बंध हटविण्याची चर्चा करतात, मात्र, शेतकऱ्यांचे हक्क हिरावून घेतात, असे पाकिस्तान पीपुल्स पार्टी सेंट्रल पंजाबचे महासचिव सैय्यद हसन मुर्तजा यांनी म्हटले आहे.
मुर्तजा यांनी सांगितले की, नोव्हेंबर महिना संपत आला तरी अद्याप गळीत हंगाम सुरू झालेला नाही. त्यांनी सांगितले की, कृषी क्षेत्र हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मात्र, सरकार आणि कारखानदार, माफिया शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीची योग्य किंमत देत नाहीत. साखर कारखाने बंद असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत, असे त्यांनी सांगितले. उसाचा दर ३०० रुपये प्रती मण हा अतिश्य कमी आहे. यातून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही हाती लागत नसल्याची स्थिती आहे असा दावा त्यांनी केला. ऊस दर ठरविण्यामध्ये शेतकरी संघटनांचे प्रतिनिधित्व असले पाहिजे असे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या आर्थिक हत्येसाठी सरकार आणि माफिया कारखानदारांना त्यांनी जबाबदार धरले आहे.












