लाहौर : पंजाबमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडत आहेत. साखर आणि आटा या दोन्ही वस्तूंचा ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. व्यापाऱ्यांच्या मते, गेल्या दोन आठवड्यात २० किलो आट्याच्या पॅकेटची किंमत ३०० रुपयांनी वाढली आहे. प्रति किलो आट्याची किंमत १५ रुपयांनी वाढली आहे.
आट्याच्या किमतीत वाढ झाली आहे. कारण, गव्हाचे दर २,३०० रुपयांवरून २,८०० रुपयांपर्यंत वाढले आहेत. दरम्यान, स्थानिक बाजारात साखर २०० रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. सरकारने ठरवलेल्या १७५ रुपयांच्या अधिकृत किमतीपेक्षा हा दर खूपच जास्त आहे. किमतींमध्ये झालेल्या प्रचंड वाढीबद्दल नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून बाजार स्थिर करण्याची विनंती नागरिकांना केली आहे.