मुल्तान : पंजाबमध्ये सर्वाधिक ऊस उत्पादन करणाऱ्या तीन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २२ लाख रुपयांचे पुरस्कार देण्यात येणार आहेत, अशी माहिती कृषी प्रवक्त्यांनी दिली. यामध्ये सर्वाधिक पुरस्कार १० लाख रुपयांचा आहे. प्रवक्त्याने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाच वर्षांच्या राष्ट्रीय उत्पादकता योजनेची कार्यवाही केली जात आहे. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि सर्वोत्तम कृषी पद्धतींच्या वापरासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. त्यासाठी विविध स्तरावर काम केले जात आहे.
ते म्हणाले , शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात झिंक सल्फेट उपलब्ध करुन दिले जाईल. प्रायोगिक तत्त्वावर प्लांट स्थापन केले जाचील. शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्राबाबत जागृक करण्यासाठी कार्यशाळा, एक दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या उसाचे प्रदर्शन करणाऱ्या भूखंडांवर ४० हजार रुपये प्रती एकर तर सप्टेंबरमध्ये लागण करणाऱ्या आलेले ऊस पिक, आंतरपिके, एकडोळा पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी ५ हजार रुपये प्रती एकर अनुदान दिले जाणार आहे.
स्पर्धात्मक वातावरण निर्मिती करण्यासाठी ऊस उत्पादन स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. राज्य स्तरावर सर्वोच्च ऊस उत्पादकाला १० लाख रुपयांचा पुरस्कार मिळेल. तर दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावरील उत्पादकास ७,००,००० रुपये आणि ५,००,००० रुपयांचा पुरस्कार मिळेल. जिल्हा स्तरावर अनुक्रमे ३,००,००० रुपये, १५०,००० रुपये आणि ७५,००० रुपये अशी पुरस्कार योजना आहे.















