परभणी : येथील श्री लक्ष्मी नृसिंह शुगर्सच्या आठव्या गळीत हंगामाचा शुभारंभ मोळी पूजनाने झाला. या सोहळ्याचे उद्घाटन डॉ. संप्रिया पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास कारखान्याचे संचालक प्रमोद जाधव, माजी कुलगुरू डॉ. वेदप्रकाश पाटील, ॲड. न. ची. जाधव, डॉ. प्रतापसिंह पाटील, नायगावचे आमदार डॉ. राजेश पवार, गुरुवर्य अच्युत महाराज दस्तापुरकर, महादभारती गुरुपण, भारती एकलव्य बाबा, नारायण गिरी महाराज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अच्युत महाराज यांनी डॉ. राहुल पाटील व प्रमोद जाधव यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा व्हावी व ऊस उत्पादकांना जास्तीत जास्त भाव मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. संचालक प्रमोद जाधव यांनी कारखान्याच्या आर्थिक नियोजनाबाबत माहिती देत, शेतकरी व कारखान्याच्या हितासाठी कार्यरत राहण्याचे आश्वासन दिले.
आमदार डॉ. राहुल पाटील यांनी भविष्यात हा कारखाना अग्रगण्य कारखान्यांत गणला जाईल, शेतकरी, ठेकेदार, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही दिली. यावेळी शेतकरी मेळाव्यात व्ही. एस. आय., पुणे येथील प्रख्यात ऊसशास्त्रज्ञ डॉ. अशोक कडलग, डॉ. कपिल सुशीर यांनी ऊस उत्पादन वाढविण्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल, ऊस व्यवस्थापनाच्या पद्धतींबद्दल व उच्च उत्पन्न देणाऱ्या जातींबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमास डॉ. विवेक नावंदर, कांतराव देशमुख, डॉ. केदार खटिंग, रवीभाऊ पतंगे, सदाशिव देशमुख, मोती शेठ जैन, अजित वरपूडकर, अरविंद देशमुख, गंगाधर मोरे, गणेशराव यादव, कारखान्याचे अधिकारी जी.एम. सुभाष सोलव, वर्क्स मॅनेजर संजय पांगरकर, डिस्टिलरी मॅनेजर गडकर, शेतकी अधिकारी तुळशीराम अंभोरे, ऊस विकास अधिकारी समर्थ कारेगावकर, एच. आर. मॅनेजर संतोष मगर, सुरक्षा अधिकारी दत्ता ढाणे आदींची उपस्थिती होती.












