मुजफ्फरनगर : टिकोला, खतौली, मन्सूरपूर आणि रोहाना साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२०-२१ मधील ऊसापोटी शंभर टक्के पैसे शेतकऱ्यांना अदा केले आहेत. तितावी साखर कारखान्याकडून २०२०-२१ या हंगामातील १.६४ कोटी रुपयांची ऊस बिले दिली जात असून जवळपास दहा कोटी शेतकऱ्यांना दिलेल्या अॅग्री इनपूटचे समायोजन करून साखर कारखान्याकडे थकीत राहणाऱ्या साडेतीन कोटी रुपयांच्या ऊस बिलांचे वितरण ३१ ऑगस्टपर्यंत केले जाणार आहे. खाईखेडी साखर कारखान्याकडूनही ३१ ऑगस्टपर्यंत ऊस बिले देण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना मिळाले आहे.
जिल्हाधिकारी चंद्रभूषण सिंह, उप जिल्हाधिकारी अमित सिंह, जिल्हा ऊस अधिकारी डॉ. आर. डी. द्विवेदी यांच्यासोबत ऊस बिलांच्या वितरणाचा आढावा घेतला. मोरना साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांनी कारखान्याला शासनाकडून अद्याप ८.५३ कोटींचे अनुदान आणि इतर बिले असे एकूण १२ कोटी रुपये येणेबाकी असल्याचे सांगितले. कारखाना पाच सप्टेंबरपूर्वी २० कोटी रुपये देणार आहे. मोरना कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना यावेळी १५ सप्टेंबरपर्यंत सर्व बिले अदा करण्याचे निर्देश देण्यात आला. भैसाना कारखान्याच्यावतीने साखर विक्री करून पैसे दिले जात असल्याचे कारखाना प्रतिनिधींनी सांगितले. ऑगस्टमध्ये आतापर्यंत ४६ कोटी रुपये देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ३१ ऑगस्टअखेर ६० कोटी रुपयांची ऊस बिले दिली जातील. दरमहा एवढे पैसे अदा करू असे आश्वासन देण्यात आले. कारखान्यांना टॅगिंगच्या नियमांचे पालन करण्याची सूचना जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी केली. यावेळी ए. के. दीक्षित, सुधीर कुमार, कमल रस्तोगी, लोकेश कुमार, धीरज कुमार, कुलदीप राठी, संजीव कुमार, नरेश मलिक, देवेंद्र कुमार आदी उपस्थित होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link












