लोकनेते सदाशिवराव मंडलिक कारखाना वाटचालीत कामगारांचे योगदान मोलाचे : वीरेंद्र मंडलिक

कोल्हापूर : लोकनेते सदाशिवराव मंडलिक कारखान्याच्या वाटचालीत कामगारांचे योगदान मोलाचे आहे, असे प्रतिपादन वीरेंद्र मंडलिक यांनी केले. ते कारखान्यातील निवृत्त २१ कर्मचाऱ्यांच्या कृतज्ञतापर सत्कार कार्यक्रमात बोलत होते. सदासाखर कामगार संघटनेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कारखाना उपाध्यक्ष आनंदराव फराकटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

गेल्या दोन महिन्यांत निवृत्त झालेल्या या सर्व कामगारांचा सत्कार कामगार प्रतिनिधी सर्जेराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संचालक महेश घाटगे, सत्यजित पाटील, भगवान पाटील तसेच निवृत्त सेक्रेटरी आर. बी. बोंगार्डे, कर्मचारी बंडोपंत पाटील यांचीही भाषणे झाली. यावेळी संचालक शिवाजीराव इंगळे, विश्वासराव कुराडे, के. डी. शिंदे, प्रदीप चव्हाण, तुकाराम ढोले, पुंडलिक पाटील, मंगल तुकान, प्रतिभा पाटील, कार्यकारी संचालक एन. वाय. पाटील आदी उपस्थित होते. सर्जेराव चव्हाण यांनी प्रास्ताविक केले तर आभार विनय रेडेकर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here