नवी दिल्ली : देशात सलग चौथ्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतेही बदल झाले नाहीत. इंडियन अॉइल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार आज पुन्हा एकदा इंधन दरात बदल करण्यात आले नाहीत. राजधानी दिल्लीत पेट्रोल १०१.४९ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ८८.९२ रुपये प्रती लिटर दराने विक्री होत आहे.
तर आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोल १०७.५२ रुपये आणि डिझेल ९६.४८ रुपये प्रती लिटर या दरावर स्थिरावले आहे. २४ ऑगस्टनंतर आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतेही बदल झालेले नाहीत. चेन्नईत एक लिटर पेट्रोलचा दर ९९.२० रुपये आणि डिझेलचा दर प्रती लिटर ९३.५२ रुपये असा आहे. कोलकाता येथे पेट्रोल १०१.८२ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ९१.९८ रुपये या दराने विक्री होत आहे. देशातील अन्य महानगरांपैकी बेंगळुरू येथे पेट्रोल १०४.९८ रुपये आणि डिझेल ९४.३४ रुपये प्रती लिटर आहे. लखनौमध्ये पेट्रोल ९८.५६ रुपये आणि डिझेल ८९.२९ रुपये प्रती लिटर या दराने विकले जात आहे. यापूर्वी मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आली होती. दोन्हींमध्ये प्रत्येकी १५ पैसे प्रती लिटर कपात झाली आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link















