नवी दिल्ली : देश पातळीवर इंधन कंपन्यांनी दिवाळीनंतर इंधनाचे दर वाढलेलेले नाहीत. देशात सलग २३ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी २७ नोव्हेंबर रोजी इंधन दरात कोणतेही बदल केलेले नाहीत. ३ नोव्हेंबर रोजी अबकारी करात कपात करण्यात आली आहे. त्यानंतर आता गेल्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या आहेत.
पेट्रोलियम वितरण कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशननुसार, २७ नोव्हेंबर रोजी इंधनाचे दर स्थिर आहेत. आज दिल्लीत एक लिटर पेट्रोलचा दर १०३.९७ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ८६.६७ रुपये प्रती लिटर आहे. मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे १०९.९८ रुपये प्रती लिटर आणि ९४.१४ रुपये प्रती लिटर आहे. देशात सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअर येथे मिळत आहे. येथे पेट्रोल ८२.९६ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ७७.१३ रुपये प्रती लिटर दराने विक्री केली जात आहे.
दरम्यान,आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली आहे. शुक्रवारी ब्रेंट क्रूड ८० डॉलर प्रती बॅरल या स्तरावर राहीले.
आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूडच्या दरात दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल केला जातो. पेट्रोलियम कंपन्या किमतीचा आढावा घेऊन दररोज दरात बदल करतात. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदूस्थान पेट्रोलियम यांच्याकडून दररोज सकाळी सहा वाजता दरात बदल केले जातात.









