नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आजही बदल दिसून आलेले नाहीत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वेबसाइटवरील माहितीनुसार दिल्लीत पेट्रोलचा दर १०३.९७ रुपये प्रती लिटर आहे. तर डिझेल ८६.६७ रुपये प्रती लिटर दराने विक्री केले जात आहे. मुंबईत पेट्रोलचा दर १०९.९८ रुपये कर डिझेल ९४.१४ रुपये आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०४.६७ रुपये आणि डिझेल ८९.७९ रुपये प्रती लिटर दराने मिळत आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोल १०१.४० तर डिझेल ९१.४३ रुपये प्रती लिटर दराने मिळत आहे.
राजस्थानमधील श्री गंगानगरमध्ये पेट्रोल ११२.११ रुपये तर डिझेल ९५.२६ रुपये आहे. पोर्ट ब्लेअरमध्ये ८२.९६ रुपये पेट्रोल आणि ७७.१३ रुपये प्रती लिटर डिझेल मिळत आहे. भोपाळमध्ये पेट्रोलचा दर १०७.२३ रुपये तर डिझेलचा दर ९०.८७ रुपये प्रती लिटर आहे. रांचीमध्ये ९८.५२ रुपये दराने पेट्रोल आणि ९१.५६ रुपये प्रती लिटर दराने डिझेल मिळत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूडच्या दरात दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल केला जातो. पेट्रोलियम कंपन्या किमतीचा आढावा घेऊन दररोज दरात बदल करतात. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदूस्थान पेट्रोलियम यांच्याकडून दररोज सकाळी सहा वाजता दरात बदल केले जातात.














