मनिला : साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सप्टेंबर महिन्यापासून सुरू करण्यावर ठाम असल्याचे शुगर रेग्युलेटरी ॲडमिनिस्ट्रेशन (SRA) ने स्पष्ट केले आहे. आणि त्यांनी ऑगस्टमध्ये कारखान्याचा गळीत हंगाम सुरू करण्याची उत्पादकांची मागणी फेटाळून लावली आहे. SRA ने सांगितले की, शेतकऱ्यांना अधिकाधिक कमाईची संधी देण्यासाठी आम्ही सप्टेंबर महिन्यात गळीत हंगाम सुरू करणार आहोत. SRA च्या म्हणण्यानुसार, अधिक परिपक्व उसापासून जादा उत्पादन मिळू शकेल.
SRA चे कार्यवाहक प्रशासक पाब्लो लुइस एस. अजकोना यांनी पत्रकारांनी सांगितले की, उत्पादन वाढविण्याचे अंतिम उद्दिष्ट साखरेच्या उत्पादनात आत्मनिर्भर बनणे हेच आहे. कन्फेडरेशन ऑफ शुगर प्रोड्युसर्स असोसिएशन, इंक., नॅशनल फेडरेशन ऑफ शुगरकेन प्लांटर्स, इंक. आणि पनाय फेडरेशन ऑफ शुगरकेन फार्मर्स, इंक. ने SRA ला ऑगस्ट महिन्यात कारखान्याचा गळीत हंगाम सुरू करण्याचे आवाहन केले होते. ही मागणी SRA ने फेटाळून लावली. ते म्हणाले, २०२२ मध्ये साखरेचा तुटवडा असल्याने गळीत हंगामाची सुरुवात ऑगस्टमध्ये करण्यात आली होती.
ऊस उत्पादक संघटनांनी दावा केला आहे की, गळीत हंगाम उशीरा सुरू केल्याने मे महिन्याऐवजी यावर्षी एप्रिल महिन्यात लागण करण्यात आलेला ऊस अधिक पक्व होवू शकतो. एजकोना यांच्या म्हणण्यानुसार, एक सप्टेंबरच्या सुरुवातीची परंपरा दीर्घ काळापासून आहे. आणि ही पद्धती विज्ञान आणि हवामानावर अवलंबून आहे. एजकोना यांनी सांगितले की, उद्योगाला मे महिन्यात एका निवेदनातून पारंपरिक पद्धतीने सप्टेंबरमध्ये गाळप सुरू करण्याविषयी पुरेशी माहिती देण्यात आली होती.












