मनीला : फिलिपाईन्सचे राष्ट्रपती फर्डिनेंड मार्कोस ज्युनिअर यांनी म्हटले आहे की, वाढत्या महागाईचे ग्राहकांवरील ओझे कमी करण्यासाठी ते साखरेच्या किमतीत ४० टक्क्यांची कपात करण्यासाठी स्थानिक साखर उद्योगासोबत चर्चा करीत आहेत. फिलिपाईन्समध्ये रिफाईंड शुगरच्या किमती या वर्षात जवळपास दुप्पट होवून ($ १.७९- $ २.०६) १००-११५ pesos प्रती किलो झाल्या आहेत. महागाईचे ते एक मुख्य कारण बनले आहे. उद्योगाच्या नियामक संस्थेने जून महिन्यात प्रतिकूल हवामान आणि आयातीमधील उशीर यामुळे देशांतर्गत साखर उत्पादनात घसरण होऊन पुरवठा कमी झाल्याचे म्हटले होते.
मार्कोस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आम्ही आता व्यापाऱ्यांशी चर्चा करीत आहोत. त्यांनी आधी ८० pesos प्रती किलोग्रॅम असा दर म्हटला होता. मात्र, आम्ही ७० pesosची मागणी केली आहे. मार्कोस यांनी आधी म्हटले होते की, फिलिपाइन्समध्ये पुरवठा वाढवणे आणि किमती स्थिर राखण्यासाठी या वर्षीच्या अखेरपर्यंत १,५०,००० टन साखर आयात केली जावू शकते. फिलिपाइन्स नेहमी ब्राझीलनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा निर्यातदार थालयंडकडून साखर खरेदी करते. फिलिपाइन्स शुगर्स मिलर्स असोसिएशनने किमती कमी करण्यासाठी अतिरिक्त साखर आयातीस पाठबळ दिले आहे.


















