सांगली : आरग (ता. मिरज) येथील मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना यंदाच्या गळीत हंगामात साडेचार लाख टन ऊस गाळप करणार असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे-म्हैसाळकर यांनी केले. कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभात शिंदे बोलत होते. कारखान्याचे सभासद दाजी खोत व सुनंदा खोत यांच्या हस्ते बॉयलरचे पूजन तर दुंडाप्पा जयान्नावर व सुजाता जयान्नावर यांच्या हस्ते होम विधी झाला.
मनोज शिंदे म्हणाले, कारखान्यातील मशिनरी दुरुस्तीची व अंतर्गत कामे पूर्ण झाली आहेत. शेती विभागाने ऊस नोंदी करून घेतल्या आहेत. वाहतूक तोडणी करारही पूर्ण झाले आहेत. कारखाना प्रशासनाने ऊस गाळपाची पूर्ण तयारी केली आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस गाळपासाठी पाठवावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष परसाप्पा पाटील, अशोक वडगावे, आण्णासाहेब पिडे, वसंत मगदूम, महादेव मोरे, बाहुबली पाटील, सलीम सौदागर, कार्यकारी संचालक सुर्यकांत शिंदे म्हणाले. यंदा दष्काळग्रस्त पाटील आदी उपस्थित होते.










