पंतप्रधान मोदी ८ सप्टेंबर रोजी आसाममध्ये बायो-रिफायनरीचे करणार उद्घाटन

गुवाहाटी : पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ सप्टेंबर रोजी आसामला भेट देतील. नुमालीगड येथे बायो रिफायनरीचे उद्घाटन करतील, अशी माहिती आसामचे मुख्यमंत्री डॉ. हीमंता बिस्वा सरमा यांनी दिली. गुवाहाटी येथील लोकसेवा भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सरमा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी नुमालिगड येथे बायो रिफायनरीचे उद्घाटन करतील. या रिफायनरीत बांबूचे २ जी इथेनॉलमध्ये रुपांतर केले जाईल. हा प्लांट ४२०० कोटी रुपये खर्चून उभारण्यात आला आहे. पंतप्रधान नुमालीगड येथे होणाऱ्या बैठकीलादेखील उपस्थित राहणार आहेत.

मुख्यमंत्री शर्मा म्हणाले की, पंतप्रधान मंगलदोई येथे अनेक महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी करतील. यानंतर, ते दरंग जिल्ह्यातील मंगलदोई येथे जातील. गुवाहाटी रिंग रोड, ब्रह्मपुत्र नदीवरील कुरुआ आणि नरेंगी यांना जोडणारा नवीन पूल आणि दरंग मेडिकल कॉलेजची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते केले जाईल. या कार्यक्रमांनंतर, पंतप्रधान आसाम सरकारने आयोजित केलेल्या भारतरत्न डॉ. भूपेन हजारिका यांच्या वर्षभर चालणाऱ्या शताब्दी समारंभाच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्यासाठी गुवाहाटी येथे परततील.

सरमा म्हणाले की, यानंतर, पंतप्रधान गुवाहाटी येथे येतील. आसाम सरकारने आयोजित केलेल्या भारतरत्न डॉ. भूपेन हजारिका यांच्या १०० व्या जयंतीच्या वर्षभराच्या समारंभाच्या उद्घाटन समारंभात ते सहभागी होतील. हा एक दिवसाचा कार्यक्रम आहे. त्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आसाममध्ये स्वागत करण्यासाठी आम्ही तयारी सुरू केली आहे.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे २९ ऑगस्ट रोजी गुवाहाटीला भेट देणार आहेत. ते नवनिर्मित राज भवनाचे उद्घाटन करतील. याबाबत मुख्यमंत्री सरमा म्हणाले की, आम्ही गुवाहाटीत नवीन राजभवन बांधले आहे आणि २९ ऑगस्ट रोजी सकाळी केंद्रीय गृहमंत्री नवीन राजभवनाचे उद्घाटन करतील. या नंतर, अमित शाह राज्यातील सर्व नवनिर्वाचित एनडीए पंचायत प्रतिनिधींच्या परिषदेत सहभागी होणार आहेत.

भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने आसाममध्ये नुकत्याच झालेल्या पंचायत निवडणुकीत प्रचंड विजय मिळवला आहे. सरमा म्हणाले की, ऑगस्टमध्ये गुवाहाटी येथे सर्व निवडून आलेल्या एनडीए पंचायत प्रतिनिधींची परिषद आयोजित केली जाईल. केंद्रीय गृहमंत्री या परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. २९ ऑगस्टच्या संध्याकाळी ते गुवाहाटी येथे आसामचे पहिले बिगर-काँग्रेसी मुख्यमंत्री गुलाब बोरबोरा यांच्या जन्मशताब्दी समारंभात सहभागी होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here