हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
पलवल (उत्तर प्रदेश) : सध्या जमिनीतील पोटॅशियम कमी झाले आहे. नायट्रोजन आणि फॉस्फरसप्रमाणे पोटॅशियमही कमी जाणवू लागल्याने शेतकऱ्यांना त्याची मात्रा वरून द्यावी लागणार आहे. ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ डॉ. प्रेमवीरसिंह पुनिया यांनी ही माहिती दिली. शेतकऱ्यांनी युरिया आणि डीएपी बरोबर पोटॅशियमही दिले तर, गुणवत्तापूर्ण पीक येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. पलवल जिल्ह्यातील बलईमध्ये त्यांनी शेतकऱ्यांना संबोधित केले. इंडियन पोटॅश लिमिटेड च्या माध्यामातून या कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पोटॅशियममुळे उसात साखरेची मात्रा वाढण्यास मदत होते. त्यामुळे उतारा चांगला मिळतो, असे डॉ. पुनिया यांनी सांगितले.
यावेळी प्रगतशील शेतकरी तेज सिंह आणि जेष्ठ अॅड. सुमनवीरदेखील उपस्थित होते. डॉ. पुनिया म्हणाले, कापूस, कोणत्याही प्रकारचे धान्य, कडधान्य, भाज्या यांच्यासाठी पोटॅशियम दिले तर, त्यांची उगवण चांगली होते. तसेच पीक चमकदार आणि जादा येते. पीक वाळण्यापासून रोखण्याला तसेच पांढऱ्या माशीच्या किडीचा प्रादुर्भावही रोखता येतो. यावेळी विविध पदाधिकारी उपस्थित होते.












