अबुजा : नायजेरीयाला साखर उत्पादनात आत्मनिर्भर बनविण्याचा संकल्प राष्ट्रपती मुहम्मदु बुहारी यांनी केला आहे. त्याबाबत केंद्रीय सरकार आणि मागास साखर कारखाने एकीकरण कार्यक्रमांतर्गत संचालकांमध्ये २१ डिसेंबर २०२१ रोजी प्रेसिडेन्शिअल व्हीलामध्ये एका करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या कार्यक्रमात बोलताना उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक मंत्री नियी अदेबायो म्हणाले की, मागास साखर कारखाने एकीकरण कार्यक्रमाच्या संचालकनात सिंचनासाठी ७३ मिलियन अमेरिकन डॉलरच्या निधीची स्थापना करण्यात आली आहे.
नुमान, सुमती, लफियागी, बासिता यांसोबतच टोटो आणि तुंगा येथील सहा साइट्सवरील १०,००० हेक्टरवरी बागांमध्ये सिंचनासाठीच्या पायाभूत सुधारणांचा उद्देश या गुंतवणुकीमागे आहे. नायजेरीयातील सेंट्रल बँकही या उपक्रमात सहभागी आहे. अदेबायो म्हणाले की, साखर उत्पादनात आत्मनिर्भरता येण्यासाठी साखर उत्पादनात वाढ करणे हा कार्यक्रमाचा उद्देश आहे. साखर उत्पादनात वृद्धीबरोबरच नायजेरीयाला साखरेचा निर्यातदार बनविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. राष्ट्रीय साखर विकास परिषदेचे (एनएसडीसी) कार्यकारी सचिव जॅक अदेदेजी यांनी सांगितले की, या योजनेतून देशात गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळण्यासाठी सक्षम वातावरण निर्माण करण्याचा सरकारचा दृढ संकल्प आहे.












